जळगाव – येथील जुने जळगावातील रहिवासी असलेले डॉ. सागर किरण खडके यांनी साऊथ कोरीयाच्या यंगनाम विद्यापीठातून केमीकल इंजिनीअरींग (मायक्रोबायोलॉजी) या विषयातून पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. गाईड म्हणून जिंते ली यांचे त्यांना सहकार्य लाभले. तसेच वनक्वाँंग विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेटही त्यांनी प्राप्त केली असून ह्यून पार्क हे त्यांचे गाईड होते. कोंबडीपासून माणसाच्या शरीरात जाणार्या व्हायरसवर त्यांनी संशोधन केले असून टिसेल इपिटो नावाची व्हॅक्सीनही त्यांनी तयार केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते डॉ. सागर खडके यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सागर यांना त्यांचे आजोबा वसंत लक्ष्मण कावळे, वडील किरण भास्कर खडके, आई हेमलता किरण खडके यांचे सहकार्य लाभले. डॉ. सागर यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण हे विवेकानंद शाळेतून झाले आहे.