जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात पेंटर कामगारांनाही राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून आज हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशन या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाकाळापासून बुडालेला रोजगार अजूनही मार्गावर आलेला नाही. सरकारने पेंटर कोकणा कोणत्याही सवलतीचा किंवा योजनेचा फायदा दिलेला नाही. आमचे राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीचे प्रस्ताव त्रुटी काढून नामंजूर केले जातात . त्रुटींची पूर्तता केली तरी नोंदणी मान्य केली जात नाही. आमच्या समस्यांचे निराकरण करून या मंडळाकडे नोंदणी करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कामगार आयुक्तांना द्यावेत. पुढच्या १५ दिवसात जिल्हा प्रशासनाने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास आमच्या संघटनेचे पदाधीकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करतील, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष इस्माईलखान यांची या निवेदनावर सही आहे .