मुंबई (वृत्तसंस्था ) – मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. राज्यात पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
आज सकाळपासून मुंबईसह कोकणात आणि विदर्भासह मराठवाड्यात चांगला पाऊस कोसळत आहे. राज्यात प्रामुख्याने कोकणसह पालघर, नंदुरबार, नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव पुढील तीन ते चार तासांसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील दोन ते तीन तास अधूनमधून तीव्र पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट आणि आसपासच्या कोकणातील काही भाग पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असताना विदर्भ, मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला होता. मात्र राज्यातील काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.