नवी दिल्ली ( वृत्तसंस्था )- घरजावई म्हणून राहणाऱ्या व्यक्तीने त्याच्या 21 वर्षीय पत्नी आणि सासूची गोळ्या घालून हत्या केली त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन करून गुन्हा कबूल केला.

आरोपी महेश, दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या बाबा हरिदास नगरमधील नारनुम पार्कमधील रहिवासी आहे. आरोपी पत्नीसोबत बाबा हरिदास नगरमध्ये सासूच्या घरी घरजावई म्हणून राहत होता, यामुळे ते त्याला आयती भाकर तोडतो असे अनेकदा टोमणे मारत असायचे. रोजच्या टोमण्यांना कंटाळून त्याने पत्नी आणि सासूला गोळ्या घालून ठार मारले. गोळी लागल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. मृत आरोपीच्या पत्नीची ओळख निधी (21) आणि सासू वीरो (55) अशी आहे. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवले.
हत्येत वापरलेले हत्यार आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.







