चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पाटणादेवी जंगलात गुरे सांभाळणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.

तालुक्यातील गणेशपूर येथील नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (वय-५०) हा पाटणा जंगलात गुरेढोरे सांभाळण्याचे काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो गुरेढोरांचा सांभाळ करीत असताना अज्ञात इसमाने त्याचे हात – पाय बांधून धारधार शस्त्राने डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून निर्घृण हत्या केली. हि घटना ५ ऑक्टोबररोजी सकाळी ८:३० ते ६ ऑक्टोबररोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली असावी असा पोलिसांनाच अंदाज आहे. काही कारण नसताना ज्ञानेश्वर पाटील याची हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तपास ग्रामीण पोलीसांकडून युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पो.नि. संजय ठेंगे यांनी दिली निलेश ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







