पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बांबरुड राणीचे येथून जवळच असलेल्या पाचोरा जळगाव महामार्गावरील पाथरी येथे विठ्ठल मंदिरासमोर उभे असलेल्या ट्रकला पाचोराकडून जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना घडली. जखमी महिलेस तात्काळ जळगाव रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शनिवारी ७ रोजी सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान पाथरी येथील रहिवाशी यांच्या मालकीचा असलेला ट्रक येथील विठ्ठल मंदिरासमोर उभा केलेला होता. ट्रक क्रमांक (एम एच १९ झेड ५५ २९) यास पाचोर्याकडून जळगावकडे जाणाऱ्या (एम एच ४६ बीएफ झिरो ३२६) या कंटेनरने उभा असताना धडक दिली.
यावेळी सकाळी शौचालयाला जाणारी महिला जखमी झाली. जखमी महिलेस तात्काळ जळगाव रुग्णालयात हलविण्यात आले. झालेल्या अपघातात कंटेनरचा पुढील भाग तर ट्रकच्या मागील भागाचे नुकसान झाले तर महिलेस जबर मार लागला आहे. पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.