भुसावळ:- येथील महिला पर्यावरण मंचच्या शहर कार्यकारिणीद्वारा आज पिकेपी नगरातील पोलीस पाटील मधुकर पाटील यांच्या शेतात लहान मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहराच्या अध्यक्ष शालिनी वाडेकर यांनी या कोरोणाच्या परिस्थितीत मुलांना निसर्ग व पर्यावरणाची जाणीव व्हावी यासाठी सीडबॉल व रोपे कसे तयार करावे याचे ज्ञान व्हावे म्हणून कार्यशाळा घ्याव्यात असे सांगितले .
राज्य समन्वयक नाना पाटील यांनी कार्यशाळा घेण्याचा उद्देश आणि मुलांमध्ये जनजागृती का करावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष आरती चौधरी यांनी मुलांमधील असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नकली क्ले क्ले खेळण्यापेक्षा प्रत्यक्ष माती चे सीड बॉल व रोपे कशी करावी याची प्रत्यक्ष जाणीव त्यांना करून देण्यासाठी कार्यशाळा आवश्यक आहे असे प्रसंग सांगितले .या कार्यशाळेत सिमरन, कुणाल ,स्वरूप ,आयुष ,उत्कर्ष, हंसिका, नक्षत्रा, श्याम ,यथार्थ, प्रशांत जागृत या गोपाल सोबत पालक तथा पदाधिकारी विद्या पाटील , शालिनी वाढेकर ,आरती चौधरी ,स्वाती भोळे, श्रद्धा महाले, शितल अरोडा, प्रियंका चौधरी, सारिका फालक, विजया निकम,, योगिता कासार, भारती चव्हाण कुणाल चौधरी, सीमा डोलारे ,काजल सेन यांनीही सहभाग घेऊन कार्यशाळेसाठी विविध स्वरूपात सहकार्य केले .या कार्यशाळेत विविध स्वरूपाच्या बिया निंबुडी ,बदाम ,बोरी, सीताफळ ,चिकू, आंबे ,सुबाबुळ ,भोकर अशा कितीतरी बियांचे सीड बॉल तयार करून मुलांना त्या बियांची व काही रोपांची माहिती करून दिली या कार्यशाळेत मुलांकडून 575 सीड बॉल बनवून जवळ जवळ शंभर रोपे विविध स्वरूपाची बनविण्यात आली यावर मुलांमध्ये जनजागृती होऊन जिज्ञासा निर्माण झाली सीड बॉल बनविताना मुलांचा आनंद चेहऱ्यावर ओसंडत होता. या कार्यशाळेत राज्य सल्लागार रघुनाथ सोनवणे राज्य समन्वयक नाना पाटील ,पोलीस पाटील मधुकर पाटील हे उपस्थित होते .