जळगाव ;- पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी “आई” महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहिर करण्यात आले आहे. 1) महिला उद्योजकता विकास 2) महिलांकरिता पायाभूत सुविधा 3) महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने / सवलती 5) प्रवास आणि पर्यटन विकास ही महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे.
पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती –
या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन प्रकल्पांना जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कम वरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकानुसार पर्यटन संचालनालयाकडून केला जाईल. पर्यटन स्थळांच्या परिसरातील महिला पर्यटन उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल.
पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले 41 प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना 15 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे. कॅरेंव्हॅन, साहसी पर्यटन (जमीन, हवा, जल) पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, बी अॅण्ड बी, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, टेंट, ट्री हाउस, हॉटेल, व्होकेशनल हाउस, पर्यटन व्हिला, वूडन कॉटेजेस, महिला चलित कॉमन किचन, टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स ऑपरेटर, मेडिकल टुरिझम व इतर पर्यटन व्यवसाय इ. 41 प्रकारच्या पर्यटन व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे.
महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसायाकरिता बँकेने रू. 15 लक्ष पर्यतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या महिलेने वेळेत कर्जाचा हप्ता भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (12% च्या मर्यादित) कर्ज परतफेड किंवा 7 वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रू. 4.50 लक्ष मर्यादेपर्यंत जे आधी घडेल तो पर्यंत व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालय व्याज परतावा स्वरूपात खालील अटींच्या अधीन राहून अदा करेल –
पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे.
4) पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेला असला पाहिजे
क) महिलांच्या मालकीच्या हॉटेल / रेस्टॉरंट्समध्ये 50% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
ड) महिलांच्या मालकीच्या दूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सी मध्ये 50% कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
इ) पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात.
ई) कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत प्रोत्साहने व सवलती-
* महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सर्किट / पॅकेजेस मध्ये महिला पर्यटकांना 20% सूट देण्यात येईल.
आंतररराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दि. 01 जे 08 मार्च या कालावधीत तसेच वर्षभरात इतर 22 दिवस म्हणजे एकूण 30 दिवस सर्व महिला पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट मध्ये फक्त ऑनलाईन बुकिंगमध्ये 50% सूट देण्यात येईल.
महिला बचत गटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इ.च्या विक्रीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी स्टॉल / जागा उपलब्ध करून देण्यात येईल,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये महिला पर्यटकांना विशेष सुविधा देण्यात येतील ज्यामध्ये अपंग / वृध्द पर्यटकांना लिफ्ट जवळच्या खोल्या देणे, महिलांसाठी विशेष खेळ / मनोरंजाचे कार्यक्रम आयोजन करणे, 5 वर्षापर्यंतची मुले असलेल्या महिला पर्यटकांसाठी पाळणाघर, जेष्ठ महिला नागरिकांसाठी सहल, दिव्यांग महिलांसाठी विशेष सहल, महिलांसाठी विशेष सहली इ. चा समावेश आहे.
नांवनोंदणी –
महिला अर्जदारांनी विहीत नमुन्यात पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज
करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्जाचे शुल्क रू. 50/- असणार आहे. सध्या ऑफलाईन अर्ज पर्यटन संचालनालयाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक नाशिक कार्यालयात संपर्क साधण्यात यावा. संपर्कासाठी पत्ता – उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्राम गृह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक 422 001 दु. क्र.- (0253)2995464/7588950697 पर्यटन संचालनालय, नाशिक यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.