जळगाव ( प्रतिनिधी ) – ३१ डिसेंबरच्या पार्टीत जास्तच बोलत होता असे म्हणत चिंचोली येथील तरुणांसह त्याच्या चुलत्याला गावातील तरुण आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली . या आरोपींच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
निलेश गडकर ( वय २१ , रा – चिंचोली , ता – जळगाव ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , २ जानेवारी रोजी रात्री याच गावातील गौरव शेळके याने कॉल करून बस स्थानक भागात बोलावून घेतले होते . मी तेथे गेल्यावर ३१ डिसेंबरच्या पार्टीत जास्तच बोलत होता असे म्हणत गौरव शेळके आणि त्याचे साथीदार दिनेश शेळके , गोपाळ शेळके आणि जळगावहून आलेले त्यांचे ४ ते ५ साथीदार यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली . ते मला हॉकी स्टिक , बॅट , चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असताना माझे काका विनोद गडकर भांडण सोडवण्यासाठी आले होते या टोळक्याने त्यांनाही मारहाण केली त्यांनतर गावातील लोक आमच्याकडे येत असल्याचे पाहून हे टोळके पळून गेले होते.
या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गौरव शेळके आणि त्याचे साथीदार दिनेश शेळके , गोपाळ शेळके आणि जळगावहून आलेले त्यांचे ४ ते ५ साथीदार यांच्या विरोधात भा द वि कलम ३२४ , १४१, १४३, १४७ , १४८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पो हे कॉ गफूर तडवी हे करीत आहेत .