जळगाव ( प्रतिनिधी ) – मूळ उत्तरप्रदेशातील व सध्या जळगावात वास्तव्यास असलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले आहे.
जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय सोनकर (रा.करंदा, ता.मडीहान, जि. मिर्झापूर, उत्तरप्रदेश, ह.मु.आर.एन.दुध संकलन केंद्र, जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. आव्हाणे शिवारातील रेल्वे लाईन जवळील आर.एन.दुध संकलन केंद्राजवळ १४ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह राहते. २४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घराजवळून या तरुणाने अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे. मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अनिल तायडे करीत आहेत.