पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे शिवारातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : येथील शिवारातील उंदीरखेडा रसत्यावरील दिलीप वेडू चौधरी यांचा बैल शेत गट क्रमांक ३४३/१ मध्ये चरत असतांना त्या बैलास विद्युत खांबामुळे विजेचा धक्का लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत दिलीप वेडू चौधरी यांनी माहिती दिली. त्यांचे उंदीरखेडा रोड येथील पारोळा शिवारातील शेत गट क्रमांक ३४३/१ मध्ये आहे. त्यांच्या पांढऱ्या रंगाचा ७० हजार रुपये किमतीच्या एक बैल चरत असताना विजेच्या खांबामध्ये करंट उतरलेले असल्याने बैलाची शेपटी खाबाला लागली. त्यामुळे बैलास विजेचा धक्का लागून जागीच मरण पावला. पशुधनाचे नुकसान झाल्यामुळे दिलीप चौधरी शोकाकुल झाले. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.