शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुंदाणे शिवारातील शेतात असलेल्या १० ते १५ शेतकऱ्यांचे शेततळ्यातील प्लास्टिक पेपर फाडून चोरून नेत शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान केल्याची केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे अभिमान पुंडलिक पाटील (वय-६५) हे शेतकरी राहतात. त्यांचे मुंडाणे शिवारातील शेत गट नंबर १०२ मध्ये शेत आहे. या शेतात ते पिकांना पाणी देण्यासाठी शेततळे बनविले आहे. या शेततळ्यात प्लास्टिक पेपरचा वापर केलेला आहे. दरम्यान १ जून रोजी सायंकाळी ६ ते २ जून सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने या शेतातील प्लास्टिकचे पेपर कापून काढून नुकसान केले आहे. तसेच काही वस्तू चोरून नेले आहे. यासह याच भागातील काही १० ते १५ शेतकऱ्यांचे शेततळ्यातील प्लास्टिक पेपर काढून नुकसान केले आहे.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर शेतकरी अभिमान पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी डोंबाळे यांना देखील निवेदन दिले आहे.