पारोळा तालुक्यात मराठखेडेनजीक घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावखेडे होळ मराठखेडेनजीक एका पायी चालणाऱ्या ३० वर्षीय इसमास एरंडोल कडून येणाऱ्या मोटरसायकलस्वारांनी धडक दिल्याने त्यात त्याच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.२ रोजी रात्री साडे नऊ वाजता घडली. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दामु लोटन भिल (वय ३० वर्षे, रा. बाभळेनाग, ता. पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. दामू हा त्याची पत्नी नर्मदा ही माहेरी मौजे पिंपळकोठा, ता. एरंडोल येथे असल्याने तिला भेटण्यासाठी दि. २ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बाभळेनाग येथून गेला होता.(केसीएन) संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास दामु भिल हा पायी पिंपळकोठा ते बाभळेनाग गावी येण्यासाठी निघाला होता. साधारण भालगाव फाटा ते मराठखेडा येथे रात्री ८ वाजेचे सुमारास संदीप हॉटेलच्या जवळ पायी चालत असतांना त्यास एरंडोलकडून पारोळाकडे जाणारी मोटार सायकल क्र. (एमएच ५४ ए ७७८४) या वाहनाने दामु लोटन भिल यास जोरदार धडक देवून खाली पाडले.
या अपघातात दामू भिल याच्या डोक्यास गंभीर स्वरूपाची जखम होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दोघे जखमी झाले.(केसीएन)दामु लोटन भिल यास कुटीर रुग्णालय पारोळा येथे उपचारासाठी घेवून गेले असता त्यास तेथील डाक्टरांनी तपासून रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मयत घोषीत केले. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहे काँ. डॉ. शरद पाटील हे करीत आहेत.