पारोळा शहरातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : येथील मराठे गल्लीतील रहिवासी ३६ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि. १६ रोजी पहाटे उघड झाली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किरण उर्फ बंटी प्रदिप सोनार (वय ३६, मराठे गल्ली, पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, तसेच काका काकू असा मोठा परिवार आहे..(केसीएन) किरण हे भडगाव तालुक्यातील गिरड येथे वायरमन म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांनी मंगळवारी दि. १६ रोजी पहाटे राहत्या घराच्या हॉलमध्ये रात्री झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
त्यांना कुटुंबीयांनी पारोळा कुटीर रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. सुनील भालेराव यांच्या खबरीवरून पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.