एरंडोल (प्रतिनिधी) : येथील एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपचे कार्यकर्ते तथा प्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा अहुजा हे दि. १६ रोजी संध्याकाळी ५ वाजता येत आहे. त्यांचा रोड शो एरंडोल शहरात आयोजित करण्यात आला असून कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आ. चिमणराव पाटील यांनी केले आहे.
महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचाराने दिवसेंदिवस आघाडी घेतली आहे. सर्व वयोगटातील नागरिकांच्या मनात अमोल पाटील हे लोकप्रिय उमेदवार झाले आहेत. एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यासाठी मेहनत घेत आहे.