पारोळा (प्रतिनिधी) – येथे ४ जानेवारीपासून राज्यस्तरीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम बक्षीस ५१००० हजार आणि ट्रॉफी गोविंद एकनाथ शिरोळे ९ माजी नगराध्यक्ष० यांच्यातर्फे, द्वितीय बक्षीस २५०००हजार आणि ट्रॉफी सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील व तिसरे बक्षिस १५००० आणि ट्रॉफी हसन भाई शाह यांच्याकडून देण्यात येणार आहे .
ही स्पर्धा पारोळा बसस्थानक मागे असलेल्या सावित्रीबाई शिरुडे मैदानावर खेळवल्या जाणार आहे जास्तीत जास्त संघांनी भाग घ्यावा असे आवाहन आयोजक राकेश करोसिया आणि राजू महाजन यांनी केले आहे.