पारोळा ;- आ. चिमणराव पाटील यांच्या दुरदृष्टीने व अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, पारोळा येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे उद्घाटनकरण्यात आले .
कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संक्रमित रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. आपल्या परिसरात ही मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे .अनेकांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे माझ्या मतदार संघातील व परिसरातील मायबाप जनतेवर ही वेळ येऊ नये त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी आ. चिमणराव पाटील यांनी स्वतः कोरोना संक्रमित असतांना देखिल मतदारसंघातीलजनतेसाठी अवघ्या ५ ते ६ दिवसांत २५ ऑक्सिजन व ७५ ऑक्सिजन बेड असे एकुण १०० बेडचे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरची उभारणी केली. .अमोल पाटील यांनी जनतेची कुठेही गैरसोय होऊ, बेड अभावी वणवण होऊ नये, रूग्णांना वेळवर उपचार मिळावे यासाठी अहोरात्र झटत अवघ्या ५ ते ६ दिवसांत सुसज्ज असे १०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले.
आज आ. चिमणराव पाटील यांच्या दुरदृष्टीने व अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी कृषि उत्पन्न बाजार समिती, पारोळा येथे हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाणजळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल पाटील सोबत उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दातीर मॅडम, गटविकास अधिकारी एन आर पाटील, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती ज्योती भगत, तालुका निबंधक कार्यालयाच्या श्रीमती सिंहले मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रांजली पाटील, कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आर बी पाटील , शहर प्रमुख अशोक मराठे, बाजार समितीचे संचालक चतुर पाटील, उपसभापती दगडू बापू पाटील, संचालक मधुकर पाटील, प्रेमानंद पाटील, पि.के. पाटील,जिजाबराव पाटील,बी.एन. पाटील सर दीपक पिंगळे बाजार समीतीचे सचिव रमेश चौधरी व मान्यवर उपस्थित होते.