पारोळा (प्रतिनिधी ) ;-पारोळा येथील बाजारपेठेत कोरोना काळात प्रशासनाच्या नियमानुसार विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्ध नगरपालिका प्रशासनाकडून ९ रोजी दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्या दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे यांच्याकडून स्वखर्चाने मास्क नसलेल्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मोटरसायकलस्वार बिनामास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. जेणेकरून नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर फिरू नये. यावेळी नगरपालिका कर्मचारी- आकाश कंडारे, जितेंद्र चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल-सुनील साळुंखे, होमगार्ड -प्रभाकर पाटील, सचिन पाटील, छोटू महाजन आदी कर्मचारी उपस्थित होते.