जळगाव ( प्रतिनिधी ) – नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थींनीना जर्मन देशात रोजगाराच्या मोठया संधी उपलब्ध असून कठोर परिश्रम आणि गुणवत्तेच्या आधारावर या संधी मिळवू शकतो असे प्रतिपादन अॅझ ईडीयु कॉर्पो ट्रेनिंग अँन्ड डेव्हलपमेंट इंडस्ट्रीचे चेअरमन परमजित सेहगल यांनी आज गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये केले.
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीतील प्लेसमेंट संदर्भात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अॅझ ईडीयु कॉर्पो ट्रेनिंग अँन्ड डेव्हलपमेंट इंडस्ट्री नवी दिल्ली आणि गोदावरी नर्सिंगच्या प्लेसमेंट सेलच्या सहकार्याने पार पडला.
कार्यक्रमासाठी परमजीत सेहगल, डायरेक्टर कन्सल्टंट, आणि स्नेहलता, जनरल मॅनेजर,हे विशेष मार्गदर्शक म्हणून तर प्राचार्य विशाखा गणविर, उपप्राचार्य जयसिंग ढाया,प्रा मनोरमा कश्यप इ उपस्थीत होते. पुढे बोलतांना परिचारीकांना विविध देशात मोठया संधी असल्या तरी अनेक दिव्य पार पाडावे लागते परंतू जर्मनीतील करिअर संधींसाठी आवश्यक कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. यासाठी आवश्यक कागदपत्र व प्रशिक्षणाच्या संधी देखिल मोठया प्रमाणावर उपलब्ध असल्याचे सांगितले. स्नेहलता यांनी अनेक वेळा परदेशातील संधीबाबत फसवणूकीचे प्रकार समोर आले असून विदयार्थ्यांनी फसवणूक होवू नये म्हणून कशी काळजी घ्यावी,योग्य संस्थांची निवड कशी व का करावी याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथीचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले तर सुत्रसंचालन व आभार प्रा मनोरमा कश्यप यांनी मानले. यशस्वीतेसाठी गोदावरी नर्सिंगचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.