• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

बकऱ्या शेतात शिरल्याच्या कारणावरून हाणामारी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, एकावर उपचार सुरू

चोपडा, (प्रतिनिधी) :- चोपडा तालुक्यातील शिवारात पपई पिकाचे नुकसान झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ६० वर्षीय शेतकरी आणि त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शिवारातील गट क्रमांक ३९४ व ३९५ मधील शेतात १७ जून रोजी दुपारी साडेदोन ते तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. जोगीलाल शंकर पारधी (वय ६०, रा. रामपुरा, चोपडा) हे दिलीप विश्वम चव्हाण यांच्या शेतात निमबटाईने शेती करतात. त्यांनी शेतात पपईचे पीक घेतले असून घटनेच्या दिवशी काही बकऱ्या शेतात शिरल्याने पिकाचे तसेच ठिबक सिंचनाच्या नळ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नुकसान झाल्यानंतर संबंधित बकऱ्या पीक संरक्षण सोसायटीमध्ये नेण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला अडवून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, पवन सिताराम पारधी याने लाकडी दांडक्याने जोगीलाल पारधी यांच्या डोक्यावर व छातीवर वार केले. तर निलेश बापू भालेराव, विक्की अशोक पारधी आणि मयुर यादव सोनार यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या घटनेत दीपक जोगीलाल पारधी हे जखमी झाले असून त्यांच्यावर चोपडा येथील हरताळकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जोगीलाल पारधी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी करीत असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. पिकाच्या नुकसानीवरून सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
1xbet russia

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon