शेकडोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून शिव कॉलनी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पंकज सुरेश पाटील आणि त्यांच्या पत्नी अंकिता पंकज पाटील हे उमेदवारी अर्ज मंगळवारी दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भरणार आहेत. त्यासाठी शिव कॉलनीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ७ येथून शिव कॉलनी भागातून भारतीय जनता पक्षातर्फे काही प्रमुख चेहरे चर्चित आहेत. यामध्ये पंकज सुरेश पाटील हे मागील दोन टर्म निवडणूक लढविलेले उमेदवार असून त्यांचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये दांडगा जनसंपर्क आहे. प्रभाग क्रमांक ७ येथे शिव कॉलनी, आशाबाबा नगर, रिंग रोड, गणेश कॉलनी, एलआयसी कॉलनी, ख्वाजामिया चौक, गजानन कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, गंधर्व कॉलनी, शिक्षक वाडी, शामराव नगर, फॉरेस्ट कॉलनी, मित्र नगर असे काही महत्त्वाचे प्रभाग येतात. या प्रभागांमध्ये शिव कॉलनी भागातून पंकज सुरेश पाटील यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी पक्ष नेतृत्वाकडे जोर धरला आहे.
२०१३ मध्ये खान्देश विकास आघाडीमधून पंकज पाटील यांनी तर २०१८ मध्ये शिवसेनेकडून पंकज पाटील यांच्या सुविद्य पत्नी अंकिता पाटील यांनी निवडणूक लढली होती. दोन्ही वेळेला क्रमांक दोनची मते त्यांना मिळाली होती. मात्र यंदा चित्र बदलले असून परिसरातील नागरिक तरुण तडफदार नेतृत्वाची मागणी करत आहेत. यामध्ये पंकज सुरेश पाटील यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता ते पुन्हा उमेदवारी अर्ज भरत आहेत
मंगळवारी ३० रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिराजवळ माजी नगरसेवक विनायक सोनवणे यांच्या घराजवळून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते निघणार आहेत. नागरिकांनी आपल्या लाडक्या व स्थानिक उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.









