पाचोरा (प्रतिनिधी ) – येथील पांडे मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः निर्मित केलेल्या राख्यांचा स्टॉल दि.१० ऑगस्ट रोजी गो. से.हायस्कूल येथे लावण्यात आला होता. या स्टॉलचे उद्घाटन मुख्याध्यापिकापी.एम. वाघ यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी गो.से. हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पांडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. पांडे विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे पी.एम. वाघ यांनी कौतुक केले. गो. से. हायस्कूल च्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी राख्या विक्रीला चांगला प्रतिसाद दिला. या प्रसंगी पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए बी. अहिरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.