जळगाव (प्रतिनिधी ) ;- येथील पंचायत समितीचे सभापती नंदलाल पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापतिपदी ललिता जनार्दन पाटील यांची आज दुपारी ३ वाजता बिनविरोध निवड अध्यासी अधिकारी तथा तहसलीदार नामदेव पाटील यांनी जाहीर केली. ललिता पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.सभापती नंदलाल शांताराम पाटील यांनी पंचायत समिती सभापती पदाचा २२ जून रोजी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील दिला होता. आज ९ जुलै रोजी सभापती पदाची निवड प्रक्रिया घेण्यात येऊन ललिता पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने अध्यासी अधिकारी तथा तहसलीदार नामदेव पाटील यांनी ललिता पाटील यांची पंचायत समितीच्या नव्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे ,उपसभापती संगीता समाधान चिंचोरे,नंदलाल पाटील, हर्षल चौधरी,सौ. ज्योती तुषार महाजन, सौ. जागृती चौधरी, सौ. विमलबाई बागुल, सौ. यमुनाताई रोटे, सौ. शीतल पाटील , सौ. निर्मलाबाई कोळी आदी उपस्थित होते. महेश जाधव ,एन.डी . ढाके , आदींनी निवड प्रक्रियेसाठी कामकाज पाहिले.
पालकमंत्र्यांच्याहस्ते ललिता पाटील यांचा सत्कार
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नवनिर्वाचीत सभापती ललिता पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, कृउबा समिती सभापती कैलास चौधरी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र चव्हाण , डॉ. कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.