भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा जळगावातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण येथून पीडित मुलीसह पकडून आणला आहे . त्याला भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . त्याच्याविरोधात यापूर्वीही अशाच स्वरूपाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे .
तालुका पो.स्टे.मधील गु.र.नं. १०१/२०२१ भादंवि ३६३ या गुन्हयांत १६ वर्षांच्या मुलीस १० जून , २०२१ रोजी आरोपी कृष्णा महादेव गोरे ( वय २४ रा.के.एम पार्क, स्वामी सवर्थ शाळेच्या मागे गुरुदत्त कॉलनी कुसूबे जळगाव ) याने वराइसिम येथून पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता फिर्यादी यांनी पिडीत मुलीचा शोध लागत नाही म्हणून पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून आरोपी कृष्णा गोरे याने सन २०१९ मध्ये गणेश कॉलनी ( जळगाव ) येथील मयत अल्पवयीन मुलगी मानसी खेरनार (वय १७ ) हिलासुध्दा पळवून नेवून १८ वर्षांची झाल्यानंतर तिचेसोबत लग्न करून तिला त्याचे घरी घेवून आला होता त्या मुलीवर त्याने १ वर्ष अत्याचार केल्याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यात त्यास अटक झालेली आहे. त्याचेविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल आहे. त्यानंतर आरोपी कृष्णा गोरे याने इंटाग्राफवर वराइसिम येथील अल्पवयीन मुलगी (पिडीत) हीचेशी ओळख करून तिचेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला पळवून नेल्याची हकीकत कळवली. पिडीत मुलगी मानसी खैरनार ही .०९ नोव्हेम्बर ,२०२१ रोजी मयत झाली आहे.
पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना हकीकत कळविली. पो नि किरणकुमार बकाले यांनी पोउनि अमोल देवढे, स फौ अशोक महाजन, पोना किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, योगिता पाचपांडे, मुरलीधर बारी यांचे पथक तयार केले. हा आरोपी हा कल्याण ( जि. ठाणे) येथे भाडयाचे घरात राहत असल्याची माहिती मिळाल्याप्रमाणे पथक कल्याण येथे रवाना केले होते. पथकाने कल्याण येथे आरोपीचा शोध घेतला तो भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील गुर.नं. १०१/२०२१ मधील पिडीत मुली सोबत भाडयाचे घरात मिळून आल्याने ताब्यात घेवून पिडीत मुलीससुध्दा सोबत घेतले पिडीत मुलगी ६ महिन्याची गर्भवती असल्याचे तिने कळविले आहे.
आरोपी कृष्णा गोरे हा अल्पवयीन मुलींना जाळ्यात अडकवून त्यांना पळवून नेवून त्यांचेवर लैंगिक अत्याचार करतो. अल्पवयीन मुली सज्ञान झाल्यानंतर त्यांचेसोबत लग्न करुन पुन्हा मुलींना घरी आणून तेथे त्यांना मानसिक त्रास देण्याची त्याला सवय आहे आरोपी कृष्णा गोरे याला भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.