नवी मुंबई (वृत्तसंस्था) – पालघरमधील सामूहिक हत्याकांडप्रकरणी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई पोलिसांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे.
या प्रतिज्ञापत्रानुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. तर २ जणांना सेवा निवृत्तीवर पाठवले आहे. तसेच १५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली असून दंडही ठोठवण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणात २५२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पालघरमध्ये १६ एप्रिलच्या रात्री साधूंची आणि चालकाची एका अफवेमुळे जमावाकडून हत्या (मॉब लिंचिंग) करण्यात आली. हे तिघे सूरतला एका अंत्यविधीसाठी जात होते.