जळगाव (प्रतिनिधी ) –धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे महामार्गालगत असणारे वाईन शॉप अज्ञात चोरटयांनी फोडून रोकडासह मद्याच्या बाटल्या असा एकूण
तब्बल ७ लाख ४९ हजार ७७० रुपयांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळधी येथे महामार्गालगत राजकुमार शितलदास मोटवानी यांच्या मालकीचे एस.पी.वाईन शॉप असून शुक्रवारी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास वाईन शॉप व्यवस्थापक भूषण अभिमान जगताप वय.२७ रा.पाळधी यांच्यासह इतरांनी दुकान बंद केले. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूला पंखा वाकवून चोरटयांनी दुकानात प्रवेश केला असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस याप्रकरणी चोरट्यांचा शोध घेत आहे.