धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाळधी येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
किशोर अशोक वानखेडे (वय-३५, रा. पाळधी ता.धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. किशोर वानखेडे हा तरुण पत्नी आणि दोन मुलींसह धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात वास्तव्याला होता. बांधकाम ठिकाणी मिस्त्रीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होता.(केसीएन) मंगळवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना किशोर वानखेडे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खाली उतरवत तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंति मयत घोषित केले आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाहीत. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.