शेतकरी राज्याचे महत्त्व, शिव रस्ते, पाणंद रस्ते तसेच रस्ते मोकळे करणे या कामांची केली पाहणी
पाळधी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने महाराजस्व अभियान योजनेचा शुभारंभ केला असून या अंतर्गत गावाच्या शेत शिवार, पाणंद रस्ते मोकळे करण्याचे व शेतात जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे.
पाळधी गावात मंडळ अधिकारी प्रशांत निंभोळकर यांनी महाराजस्व अभियान योजनेअंतर्गत गावातील तलाठी, पोलीस पाटील यांच्यासमवेत गावात शिवार फेरी काढून शेतकरी राज्याचे महत्त्व, शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबत पाहणी करून गावातील इतर कामांची पाहणी केली.
तसेच पाळधी गावातील दोन शिव रस्ते मोकळे करून शेतकरी राजाला शेतात जातांना कोणतीही अडचण येणार नाही व त्यांच्या उत्पादनात कशी भर पडेल याबाबत चर्चा करून रस्ते मोकळे करणे बाबत नियोजन करण्यात आले.