पाळधी (प्रतिनिधी) – पाळधी गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास एक लाख रुपयांचा धनादेश मंडळअधिकारी प्रशांत निंबोळकर यांनी घरी जाऊन धनादेश देण्यात आला.
पाळधी गावातील मयत प्रविण सुक्राम इंगळे यांनी काही महिन्यांपूर्वी शेतात माल कमी पिकणार असल्याने व डोक्यावर जास्त कर्ज असल्याने त्यांच्याच शेतात सकाळी झाडाला दोरी बांधून गळफास घेतला होता. प्रविण इंगळे घरातील कर्ता पुरुष असल्याने त्यांचा संसार देखील उघड्यावर पडल्याने या शेतकऱ्याने कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या केली होती.
धनादेश वाटपप्रसंगी तलाठी, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, माजी सरपंच व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच उभारी योजनेअंतर्गत मयत शेतकऱ्यांच्या पत्नी यांच्याकडून विविध योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत.