जळगाव ( प्रतिनिधी ) – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही कोरोना निदानाचा तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे . गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेले अधिकारी , कर्मचारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी , सामाजिक संघटनांचे पदाधिकारी , कार्यकर्ते आदींनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी झाले होते . तेथे अनेक अधिकारी , कर्मचारी , आणि लोकांशी त्यांचा संपर्क आला होता, त्यामुळे सर्व संबंधितांनी गांभीर्याने लक्ष देऊन आपापली तपासणी करून घ्यावी असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले . आज सकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आपला स्वाब तपासणीसाठी पाठवला होता आज दुपारी त्यांचा तपासणी अहवाल मिळाल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले . पालकमंत्री म्हणून त्यांचा नेहमीचा व्यापक जनसंपर्क लक्षात घेता जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरीलही लोकांशी संपर्क येतो त्यामुळे आता सर्वांनी तपासणी करून घ्यावी लागणार आहे.