“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत घराघरात फडकणार राष्ट्रध्वज
जळगाव (प्रतिनिधी) :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९. ०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. तसेच, भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत १३, १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक घर, दुकान, खाजगी आस्थापना तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, वीरपिता यांनी उपस्थित राहावे. यादिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजता या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी ८.३५ वाजेच्या पूर्वी किंवा ९.३५ वाजेच्यानंतर आयोजित करावा. असे तहसिलदार (सा.प्र) डॉ. सुरेश कोळी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावयांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
तर, भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत १३, १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक घर, दुकान, खाजगी आस्थापना तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या अभियानात सहभागी होऊन आपल्या घरावर व आस्थापनांवर राष्ट्रध्वज लावावा आणि राष्ट्रध्वज लावतानाच्या नियमांचे पालन करावे. तसेच, ध्वजासोबत छायाचित्र काढून ते harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे. या अभियानात सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन स्वातंत्र्य दिन साजरा करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.