जळगाव (प्रतिनिधी) – आदर्श गाव राजवड तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका पाकीजा उस्मान पटेल यांना ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय कर्तृत्वान महिला नारी रत्न पुरस्कार जाहीर झाला .तसेच महावीर इंटरनॅशनल मुंबई या संस्थेतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार बहाल करण्यात आला.
पाकिजा पटेल यांनी सामाजिक शैक्षणिक, उद्योग, संस्कृती ,कला, साहित्य क्षेत्रात भूषणावह व प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पाकिजा पटेल यांना यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना काळात त्यांना विविध राज्यातून कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहेत. हे पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल आहे. त्यांचे हेच प्रभावी कार्य अनेक संस्थांना पुरस्कार देण्यासाठी प्रोत्साहित करतात. कर्तृत्ववान महिला नारी रत्न या पुरस्काराने राजवड गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे . त्यांना मिळालेल्या दोन्ही पुरस्काराने राजवड गावाची पुरस्काराची परंपरा त्यांनी अखंडित ठेवली आहे. गावातील प्रतिष्ठित मंडळींनी पाकिजा पटेल यांचे अभिनंदन केले आहे.