जळगाव ( प्रतिनिधी ) – लग्नानंतर सुरुवातीचे जेमतेम ४ महिने बरी वागणूक दिल्यावर नंतर जवळपास साडेसहा वर्षे पैशांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या आणि कंटाळून माहेरी राहत असलेल्या पत्नीला माहेरात जाऊनही मारहाण करणाऱ्या आरोपी नवऱ्याविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादी पत्नी अर्चना रंधे ( वय २३ , रा – हरिविठठलनगर , ह मु – मोहाडी ) यांनीं दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , त्यांचा विवाह १६ जून , २०१६ रोजी आनंद रंधे यांच्याशी मोहाडी येथे झाला होता . लग्नात अर्चना रंधे यांच्या वडिलांनी १ लाख रुपये वरदक्षिणा दिली हाती . लग्नानन्तर त्यांना एक मुलगी झाली ती आता ४ वर्षांची आहे . लग्नानन्तर सुरुवातीचे जेमतेम ४ महिने बरी वागणूक दिल्यावर त्यांचा सासरी पैशांसाठी छळ केला जाऊ लागला . या त्रासाची माहिती त्यांनी आई- वडिलांना दिली तरी समाजात आपली बदनामी होईल म्हणून थोडा त्रास सहन कर , त्यांची वागणूक सुधारेल , असे त्यांना समजावून सांगितले जात होते . आरोपी पती गुंड प्रवृत्तीचा असून तो घर बांधायला आणि मोटारसायकल घ्यायला माहेराहून पैसे आणावेत म्हणून त्रास देत होता त्यावेळी व्याजाने पैसे काढून अर्चना रंधे यांच्या वडिलांनी त्यांची मागणी जमेल तशी पूर्ण केली होती . त्यानंतरही आरोपीच्या वागण्यात सुधारणा झाली नाही नंतर त्याने व्यवसाय सुरु करण्यासाठी ४ लाख रुपयांची मागणी करून छळ सुरूच ठेवला . असा त्रास साडेसहा वर्षे अर्चना रंधे यांना सहन करावा लागला . या त्रासाला कंटाळून अर्चना रंधे माहेरी निघून आल्यावरही आरोपी पती त्यांना माहेरात जाऊनही पत्नीला मारहाण करीत होता . या फिर्यादीवरून आरोपी नवऱ्याविरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .