जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पहूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ आणि एस एस मणियार लॉ कॉलेजचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने कायदा जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते .


पहूर येथील लोकनियुक्त सरपंच निता पाटील या शिबिराच्या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या प्रास्ताविक अँड देवेंद्र पारळकर यांनी केले .
ॲड.एस आर पाटील , पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी महिलाविषयी कायद्याची माहिती दिली. राजधर पांढरे , बाबूराव घोंगडे , रामेश्वर पाटील , अंगणवाडी सेविका सुषमा चव्हाण यांनी पीडित महिला व त्यांचे अधिकार याविषयी माहिती दिली . अँड देवेंद्र पारळकर व प्रसन्न फूसे यांनी विधी सेवा प्राधिकरणविषयी सविस्तर मार्गदर्शन करीत कार्यक्रमाचा समारोप केला.

या प्रसंगी गावातील सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, आशा स्वयसेविका, अंगणवाडी शिक्षिका, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, ॲड. दिपाली सुरवाडे, ॲड देवेंद्र जाधव, ॲड प्रसन्न फासे, उपसरपंच श्याम सावळे , रामेश्वर पाटील , बाबुराव घोंगडे , शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे , अँड एस आर पाटील , माजी सरपंच शंकर जाधव , उपसरपंच राजू जाधव उपस्थित होते.
एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या कल्पना शिंदे, प्रिया शिंपी, तेजस्विनी पाटील, पूजा सांखला, संकेत राजपूत, सचिन पाटील, गोविंदा जाधव, कोमल काळे आदींनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले तर आभार ॲड प्रशांत पाटील यांनी मानले.







