पहूर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहूर येथे शिवसेना शहर कार्यालयाचे उद्घाटन भिका भाऊ मराठे यांच्या हस्ते करण्यात आले जामनेर रोड श्रीराम बेकरी जवळ शहर शिवसेना कार्यालयाचे आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर जनतेच्या व शिवसैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शहर शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे, शहर प्रमुख सुकलाल बारी, उपतालुकाप्रमुख अशोक जाधव, कैलास पांढरे, विजय देशमुख, अजय जाधव, दिलीप पांढरे, शुभम घोलप, अण्णा देशमुख, संभाजी देशमुख, विकास अण्णा जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.








