पहूर , ता जामनेर (प्रतिनिधी ) – ऊन ,वारा पावसाची तमा न बाळगता वृत्तपत्र वितरणाचा वसा आणि वारसा प्रामाणिकपणे जोपासणाऱ्या वृत्तपत्र वितरक बांधवांचा पहूर शहर पत्रकार संघटनेच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला .
शालेय जीवनात वृत्तपत्र वितरण करून उत्तुंग यशोशिखरावर पोहोचलेल्या भारतरत्न डॉ . एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वृत्तपत्र वितरक दिन साजरा केला जातो .पहूर पेठ गृप ग्रामपंचायत कार्यालयात पहूर शहर पत्रकार संघटनेच्या वतीने आज 15 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक शांताराम बापू लाठे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी प्रास्ताविक केले .प्रारंभी भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .
यावेळी शांताराम लाठे , शरद बेलपत्रे , मनोज जोशी , गणेश पांढरे यांनी वृत्तपत्र वितरकांप्रती आपल्या कृतज्ञ भावना व्यक्त करून त्यांच्या कार्याचा आणि सेवेचा गौरव केला . यावेळी वृत्तपत्र वितरक शांताराम लाठे , शरद बेलपत्रे , गणेश तायडे , गणेश पांढरे आदी वितरकांचा शहर पत्रकार संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला . या प्रसंगी शहर पत्रकार संघटनेचे सचिव जयंत जोशी , उपाध्यक्ष डॉ .संभाजी क्षीरसागर, राजेंद्र चौधरी , शांताराम गोंधनखेडे , शरद नरवाडे , श्री घाटे आदींची उपस्थिती होती . चेतन रोकडे यांनी सुत्रसंचलन केले . रविंद्र लाठे यांनी आभार मानले.