पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) – पहूर येथील आयडीबीआय बँक शाखेत कार्यरत असलेल्या कॅशियरने बैंकेत जमा झालेले जास्तीचे पैसे घेऊन संबंधित व्यक्तीस परत केले. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या सर्वत्र स्वार्थ आणि फसवेगिरीचे प्रकार घडत असताना पहूर येथील आयडीबीआय बँकेत मात्र प्रामाणिकपणाची अनुभूती उपस्थितांना आली . जिजाई मेडीकलचे संचालक वैभव सुपाळकर यांनी काल १२ रोजी बँकेत भरणा केला. यात श्री. सुपाळकर २०० रुपये त्यांच्या नजर चुकीने जास्त गेले.
बँकेचे रोखपाल कृष्णा राजपूत यांनी शोध घेतला असता शिल्लकचे २०० रुपये जिजाई मेडीकलचे असल्याचे निष्पन्न झाले. बँकेचे व्यवस्थापक मोहन चव्हाण यांनी श्री . सुपाळकर यांच्याशी तत्काळ संपर्क करून त्यांच्याशी या विषयी चर्चा केली असता सदर जास्तीचे पैसे असल्याचे त्यांनी सांगीतले. या प्रामाणिकपणाबद्दल जिजाई मेडिकलचे फार्मासिस्ट श्री . सुपाळकर यांनी बँकेत जाऊन मॅनेजर आणि कॅशियर यांचा गुलाब पुष्प ,स्नेहवस्त्र आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी सहाय्यक व्यवस्थापक अनिल जोशी ,निखील जोशी, सहाय्यक व्यवस्थापक शरद बारी, प्रज्ञा नागदिवे, हेमंत जोशी, सुरेश बेढे, महेश सोनवणे , ज्ञानेश्वर देशमुख , राहुल घरोटे , सुरेश राऊत , गजानन सोनवणे , सागर बारी यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते .सूत्रसंचालन अशोक सुरवाडे यांनी केले आभार डॉ . रवींद्र बडगुजर यांनी मानले .