पहुर ;- जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील स्वस्त धान्य दुकानदार अरुण बाबूलाल रुणवाल यांच्या दुकानात आज सकाळी नऊ वाजता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत तांदूळ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गणेश भाऊ पांढरे सरपंच नीता पाटील रामेश्वर पाटील उपसरपंच श्याम सावळे तलाठी सुनील चव्हाण स्वस्त धान्य दुकानदार जितेंद्र लोंढा रवींद्र घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत तांदूळ वाटप करण्यात आले या योजनेअंतर्गत आज सकाळी 50 लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात आले सोशल डिस्टेंस राखत लाभार्थ्यांना प्रति व्यक्तीनुसार पाच किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात आले कोविंड एकोणावीस विषाणूच्या संसग॔ प्रतिबंध उपाय योजना म्हणून संपूर्ण देशभरात लाॅक डाऊन करण्यात आले या काळात प्रधानमंत्री कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना एप्रिल मे जून या तीन महिन्यात प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार आज सकाळी स्वस्त धान्य दुकानात मोफत वितरणाचा शुभारंभ पहूर येथील तलाठी सुनील चव्हाण विभाग प्रमुख व शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गणेश पांढरे सरपंच नीता पाटील रामेश्वर पाटील उपसरपंच श्याम सावळे स्वस्त धान्य दुकानदार अरुण रुणवाल जितेंद्र लोढा रवींद्र घोलप उपस्थितीत मोफत तांदूळ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला