उद्या शपथविधी होण्याची शक्यता
मुंबई (वृत्तसेवा) :- राज्याच्या मंत्रिमंडळात मागील अनेक मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. आता उद्या मंगळवारी दि. २६ रोजी पहिल्या टप्प्यात तिन्ही पक्षाचे एकूण २० मंत्री शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी निलंगेकर, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भातखळकर, रवींद्र चव्हाण तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, भरत गोगावले किंवा तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं कळतं आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात असे एकूण २० मंत्री शपथ घेणार आहेत, अशी माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे.