आ. मंगेश चव्हाण यांची माहिती
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- गिरणा मन्याड नद्यांच्या मधील समृद्ध परिसरामध्ये नागरिकांशी संवाद साधला. नार – पार- गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी महायुती सरकारने ७ हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. याचा आनंद परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. गिरणा व मन्याड नदीजोड प्रकल्पासाठीचा सर्वे पहिल्यांदा करण्यात आला. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मन्याड धरणावरून निघणाऱ्या पाटचाऱ्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. रोहिणी व १८ गावे पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या परिसरातील गावांना जलसमृद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या प्रयत्नाला साथ परिसरातील नागरिक देत आहेत.
हिरापूर, तळेगाव, कृष्णानगर, करजगाव, घोडेगाव, खराडी, जूनपाणी, राजदेहरे, राजदेहरे सेटलमेंट, तुकातांडा, पिंपळगाव, रोहिणी, हातगाव, अंधारी, तमगव्हाण,, पिंपळवाड निकुंभ, ,माळशेवगे, शेवरी, ब्राह्मणशेवगे, पिंप्री बु प्र दे, डोण, देवळी,चिंचखेडे, दडपिंप्री-परशुराम नगर, उंबरखेड, पिंपळवाड म्हाळसा, टाकळी प्र दे, आडगाव, शिरसगाव, तळोदा प्र दे, काकळणे, नांद्रे, सायगाव, मांदुरणे, उपखेड, सेवानगर, पिलखोड, तामसवाडी या गावातील नागरिकांशी संवाद साधला.