जळगाव शहरातील विवाहितेची तक्रार ; शिरपूर तालुक्यात घडला गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात गुजराल पेट्रोल पंपाजवळ वासू कमल विहार येथे राहणाऱ्या पतीने पहिली पत्नी असताना देखील आणखी एका महिलेशी विवाह केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ३७ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. या विवाहितेचा स्वप्निल अरुण चौधरी (रा. वासू कमल विहार, गुजराल पेट्रोल पंप, जळगाव) यांच्याशी विवाह झालेला आहे. असे असताना त्यांचा व पतीचा घटस्फोट झाल्याबाबतचे बनावट दस्तऐवज तयार करून आणि ते दस्तऐवज दुसरी पत्नी संशयित आरोपी राजश्री रोहिदास कोळी उर्फ राजश्री स्वप्निल चौधरी हीचे वडिलांना दाखवून ते खरे असल्याचे सांगितले. तसेच ७ जणांनी संगनमताने स्वप्नीलचा विवाह लावून फिर्यादी विवाहितेची फसवणूक केली म्हणून रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपींमध्ये तक्रारदार महिलेचा पती स्वप्नील अरुण चौधरी, त्याने विवाह केलेली दुसरी पत्नी राजश्री रोहिदास कोळी उर्फ राजश्री स्वप्निल चौधरी (वय ३५), कमल अरुण चौधरी (सर्व रा. वासुकमल विहार, जळगाव) राजेश पंढरीनाथ पाटील (रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी, जळगाव), डॉ. मधुकर बळीराम चौधरी, विमल मधुकर चौधरी, संदीप मधुकर चौधरी, विद्या संदीप चौधरी यांच्यासह लग्न लावणार एक ब्राह्मण (पूर्ण नाव काय माहित नाही) (सर्व रा. वर्सी ता. शिरपूर जि. धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.









