भडगाव ( प्रतिनिधी ) – पदवीधर मतदारांसाठी व शिक्षकांच्या कामासाठी सदैव तत्पर आहे आतापर्यंत विविध आंदोलने करून शिक्षकांच्या हक्कासाठी झटत राहिले यापुढेही काम चालूच राहील राज्यातील ५५ हजार शिक्षकांचे रखडलेले वेतन त्यांना मिळवून दिले पुन्हा संघर्ष करण्यासाठी तयार आहे असे उदगार महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्ष शुभांगी पाटील यांनी काढले त्या सार्वे ( ता पाचोरा ) येथे बोलत होत्या
शुभांगी पाटील यांनी आगामी नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे ही निवडणूक जिंकून दाखवनार असा विश्वास यावेळी व्यक्त केला शुभांगी पाटील सार्वे येथील माहेरवाशीन असल्याने त्यांनी जळगावकन्या म्हणून पदवीधर मतदारांना साद घातली आहे
यावेळी जि प सदस्य मनोहर पाटील , अँड विवेक सूर्यवंशी , सार्वेचे सरपंच तिरोना पाटील , खाजोळाचे सरपंच गोकुळ पाटील, नेरीचे सरपंच सचिन पाटील, हिंगोनेचे सरपंच ज्ञानेश्वर महाजन, भामरेचे सरपंच भैय्यासाहेब पाटील, श्रावण पाटील , विनोद पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, शरद पाटील, भास्कर पाटील, राजेंद्र पाटील व कजगाव परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.