पाचोरा (प्रतिनिधी) – मौजे नांद्रा ते बहुळेश्वर रस्ता आ. किशोर पाटील यांनी तातडीने दखल घेऊन व पाठपुरावा शासन दरबारी केल्याने ११ मीटर खडीकरण रस्ता मंजुर केल्याबद्दल आज आ. पाटील यांच्या शिवालय निवासस्थानी नांद्रा ग्रामस्थातर्फे आभार मानले.
गेले अनेक महिन्यापासुन नांद्रा ते बहुळेश्वर रस्ताची परीस्थीती फार अवघड व दयनीय झालेली असुन पायी चालणे सुध्दा कठीण झाले होते.
पावसाळ्यात बैलजोडीचे सुद्धा हाल पाहावत नाही.शेतीला लागण्यारया खताच्या पिशव्या शेतात नेणे व शेतातील माल घरी आण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती, पर्यायाने मजुरही कामाला येत नव्हते ,या सर्व गोष्टीची समस्या सर्व ग्रामस्थासह योगेश सुर्यवंशी व ग्रा.पं सदस्य यांनी आ. पाटील यांच्याकडे माडंली होती.
तातडीने दखल घेऊन आमदार किशोर आप्पा यांनी रस्त्याची पाहणी करून लगेच तात्काळ दखल घेऊन नांद्रा ते बहुळेश्वर रस्ता ११ मिटर खडीकरण मंजुर करून रस्ताचे काम सुरू केले आहे. तरी नांद्रा व बहुळेश्वर शिवारातील शेतकऱ्यांनी व नांद्रा ग्रामस्थांनी आज कार्यसम्राट आ. पाटील यांचे आभार मानले आहे.
यावेळी पदम बापू पाटील जि.प.सदस्य जळगाव,ग्रा.पं सदस्य योगेश सुर्यवंशी , विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन मुरलीधर सुर्यवंशी,माजी चेअरमन रमेश सुर्यवंशी , निबा सुर्यवंशी परमेश्वर सुर्यवंशी , धना पाटील , कैलास पाटील , किरण बोरसे , अभिमन पाटील ,आदी ग्रामस्थ हेआ. पाटील यांचे आभार मानण्यासाठी यावेळी उपस्थित होते.