पाचोरा शहरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : घरगुती वादातुन पाचोरा शहरात ४२ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. २ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैशाली अनिल पाटील (वय ४२ वर्ष, रा. आशिर्वाद ड्रिमसिटी, पाचोरा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. वैशाली पाटील यांचे माहेरच्या नातेवाईकांनी, त्यांचे पती अनिल पाटील यांचेशी किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असत. पती अनिल पाटील वैशाली हिस शिविगाळ व मारहाण करीत असे असा आरोप केला आहे. अखेर वैशाली पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. दरम्यान घटनेची माहिती वैशाली यांच्या माहेरच्या मंडळींना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच आक्रोश केला.
दरम्यान वैशाली हिचा भाऊ गजानन भास्कर पाटील (रा. लोंढ्री ता. जामनेर) यांचे फिर्यादीवरून पती अनिल भानुदास पाटील व सासू छबाबाई भानुदास पाटील यांचेविरुद्ध वैशाली हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे हे करीत आहे.