पाचोरा (प्रतिनिधी) :- पी. टी.सी. संचलित श्री. गो से हायस्कूल, पाचोरा शाळेच्या दर्शनी फलकावर श्री राम प्रभु अवतरले. हे औचित्य साधून गो से हायस्कूलचे कलाशिक्षक सुबोध मुरलीधर कांतायन यांनी शाळेच्या ब्लॅकबोर्ड वर श्री राम प्रभु खडूच्या माध्यमातून चित्रित केले आहे.
चित्राचे बारीक निरीक्षण केल्यास भरपूर अश्या विविध चित्रण आपल्याला यात दिसून येते. त्यापैकी पहिले म्हणजे चित्रात दोन रामाच्या कलाकृती साकारल्या आहेत यात त्असे दाखवायचे आहे की डाव्या बाजूला असलेले राम वनवासातील राम असून आजूबाजूला झाडी दाखवली आहे आणि ते ५०० वर्षानंतर आपल्याला जन्मस्थानी अयोध्या त्या वास्तूत जातांना पहात आहेत.
राम सेतू अजूनही अस्तित्वात आहे. तो सरळ भव्य अश्या राममंदिर पर्यंत दाखविला आहे.. श्री राम येणार पण सोबत सिता आणि लक्ष्मण पण येणार… म्हणून श्री रामा सोबत डाव्या बाजूला सिता यांचे पाऊल गुलाबी रंगात व उजव्या बाजूला लक्ष्मणाचे पाऊल नारंगी पिवळ्या रंगात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.