पाचोरा (प्रतिनिधी) : जळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत हे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाचोरा येथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पंचायत समितीचे माजी सभापती तथा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार एड. ललिता पाटील, जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विष्णू भगाळे, वैशालीताई सूर्यवंशी, रमेश बाफना, उद्धव मराठे, अरुण पाटील, शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, युवक तालुका अध्यक्ष अभिजीत पवार, कार्याध्यक्ष पिंटू भामरे, सामाजिक न्यायचे विलास सोनवणे, भडगावचे तालुका अध्यक्ष राहुल पाटील, युवक अधक्ष कुणाल पाटील, युवक जिल्हा प्रवक्ते भूषण पाटील, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सिताराम पाटील, सत्तार पिंजारी, रज्जू बागवान, उमेश एरंडे, गौरव शिरसाट, सचिन शिंदे, सुनील पाटील, बाबाजी ठाकरे, जनार्दन पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.