पाचोरा (प्रतिनिधी) :- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूल पाचोरा येथे कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सी.एल. जाधव या २० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्यात. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ,बुके देऊन सत्कार करण्यात आला.
सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव येथे नुकतेच सेवानिवृत झालेले प्राचार्य व्ही.एस.साळुंखे यांचा सत्कार शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी,तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, कुऱ्हाड हायस्कूलचे चेअरमन सतीश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी श्रीमती सी.एल जाधव व व्ही. एस.साळुंखे यांनी शाळा व संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका पी. एम.वाघ, उपमुख्याध्यापक एन.आर. ठाकरे ,पर्यवेक्षक आर.एल.पाटील ,ए.बी. अहिरे, अंजली गोहील, सुखदा पाटील यांनी वरील सत्कारमूर्तींचा शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव केल्या. प्रसंगी किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.तडवी, सत्कारमूर्तींचे कुटुंबीय, नातेवाईक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस.पाटील व आभार प्रदर्शन एम.एन देसले यांनी केले.