पाचोरा (वार्ताहर) – ईशान्य भारतातील मणिपूर हा आदिवासी बहुल प्रदेश, गेल्या अनेक दिवसापासून धार्मिक – जातीय दंगलीमुळे धुमसतोय. या दंगलींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंटरनेट बंदी उठल्या नंतर मानवी मनाच्या संवेदनशिलतेला अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे, ज्यात उन्मादी पुरुषांचा जमाव निर्वस्त्र केलेल्या असहाय्य आणि लाचार महिलांना पकडून घेऊन जात महिलांना विवस्त्र करून त्यांचेवर सामुहिक अमानवीय अत्याचाराची घटना समोर आली आहे.
तसेच सांगली जिल्हातील मिरज येथील बेडगगावामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडेकर यांच्या नावाची स्वागत कमान भाजप शाषित स्थानिक ग्राम पंचायतीने एक महिन्यापूर्वी जमीनदोस्त केली. या कारणावरून स्थानिक गामस्थ व ग्राम पंचायत असा संघर्ष सुरू आहे. ग्रामपंचायतीने कमानीसाठी परवानगी दिली होती मात्र नंतर ती कमान बेकायदेशीर असल्याचे ठरवून १६ जून रोजी पाडण्यात आली. संविधान निर्मात्याचे नाव असलेली कमान जी समाजासाठी स्वाभिमानाची प्रेरणा व अस्मीता निर्माण करणारी होती परंतू संविधान विरोधी भाजप शाषित ग्राम पंचायतीने संगनमताने जमीन दोस्त केली. या घटनेचा तिव्र निषेध म्हणून बेडग गावकरी संपूर्ण कुटुंबासह गाव सोडून लाँग मार्च काढत मुंबईच्या दिशेने पावसाळी अधिवेशन सुरु असलेल्या विधिमंडळाकडे दोषींवर कारवाई व न्याय मागण्यासाठी निघाले आहेत.
या धार्मिक उन्मादी व जातीयवादी प्रवृत्तीचा पाचोरा शहरातील प्रागतिक विचारधारा जोपासणाऱ्या नागरिकांच्या वतीने दोनही घटनांचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त करत पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खालीलदादा देशमुख, आनंद नवगीरे,प्रवीण ब्राह्मणे, जय वाघ, प्रदीप पाटील,विश्वनाथ भिवसने अँड,कैलास सोनवणे, प्रदीप जाधव ,प्रा.दीपक ब्राह्मणे, राजरत्न पानपाटिल, सागर पवार किरण अहिरे, आकाश खैरनार यांची उपस्थिती होती.