पाचोरा तालुक्यात १० शाळांचा झाला सन्मान
पाचोरा (प्रतिनिधी) :- एक पेड मा के नाम या केंद्र शासनाच्या उपक्रमाला पाचोरा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून शालेय विद्यार्थ्यांनी सुमारे १२ हजार ६८८ रोपांची लागवड अभियान काळात केली. २४० शाळांनी इको क्लबची स्थापना शालेय पातळीवर केली आहे. गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दहा शाळांचा अभिनंदन पत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.
” एक पेड मा के नाम ” हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम,मातृ प्रेम, पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीची जाणीव या उपक्रमातून होईल, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी याप्रसंगी केले. सदर कार्यक्रमाला शापोआ अधीक्षक सरोज गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील,केंद्र प्रमुख शांताराम वानखेडे, अभिजित खैरनार, संगणक प्रोग्रामर योगेश अहिरराव, विषय तज्ञ गिरीश भोयर, सुनील शिवदे यांची उपस्थिती होती.
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शाळा व लावलेली रोपे
१. पी के शिंदे विद्यालय पाचोरा १०३५
२. एस पी शिंदे विद्यालय पाचोरा ७१५
३. जी. एस. हायस्कूल पाचोरा ७०३
४. सु भा प्राथ पाचोरा ४५३
५. न्यू इंग्लिश मिडीयम पाचोरा ३८२
६. सिंधुताई शिंदे विद्यालय पाचोरा ३२९
७. ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरे ३२७
८. खाजगी प्राथ नगर देवळा २९८
९. माध्य विद्यालय शिंदाड २५९
१०. जि प शाळा वरखेडी २४७