पाचोरा (प्रतिनिधी) – नगर पालिका निवडणुकीसह इतर निवडणूकां स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागा असा संदेश देत पक्षाचे काम करेल तोच पदावर राहील असा इशारा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांनी दिला आहे.
येथील शहर व तालुका कॉंग्रेसने शक्तीप्रदर्शन करत मेळाव्याचे आयोजन दैवयोग पाटील मल्टीपर्पज हॉलमध्ये केले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार होते. जळगाव शहर अध्यक्ष शाम तायडे, प्रदेश सरचिटणीस विनोद कोळपकर, जिल्हा प्रशासन सरचिटणीस जमील शेख, सरचिटणीस (जनसंपर्क) ज्ञानेश्वर कोळी, सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील, एस टी सेल प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे, तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष शरीफ खाटीक, भडगाव तालुकाध्यक्ष रतीलाल महाजन, शहरअध्यक्ष दिलीप शेंडे, महिला अध्यक्षा ऐश्वर्या राठोड, महीला जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, प्रदीप देशमुख, रवी जाधव, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी, प्रदीप सोनवणे, प्रा. एस डी पाटील, शेख इस्माईल शेख फकीरा, सौ. क्रांती पाटील, महीला शहर अध्यक्षा शीला सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
मेळाव्यात जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले की, पक्षाचे संघटन महत्वाचे आहे सर्व तालुक्यात दौरे करण्यात आले आहेत पाचोरा हा शेवटचा दौरा होता. पाचोरा तालुका हा कॉंग्रेसला माणणारा तालुका असुन संघटन मजबूत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्याबद्दल तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी व शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांचे कौतुक करुन मेळाव्यात नव्याने प्रवेश घेणारे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते याचेही पवार यांनी कौतुक केले.
प्रास्ताविक भाषणात तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी कॉंग्रेस कार्यकर्ता शहरात व तालुक्याच्या जनतेच्या प्रत्येक कामात पडत आहे. शेतकरी वर्गासाठी ” कॉंग्रेस हेल्प किसान ” , ” कॉंग्रेस रोजगार हेल्प ” सह कॉंग्रेस आरोग्यसेवक अशा संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. राजु महाजन, अॅड अमजद पठाण, इरफान मनियार, यांनी मनोगत व्यक्त केले सुत्रसंचलन अमजद मौलाना, डॉ अनिरुद्ध सावळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल शिंदे, कल्पेश येवले, गणेश पाटील, प्रदीप चौधरी, शरीफ शेख , रवी पाथरवट, शिवराम पाटील, बबलु ढाकरे, सचिन पाटील, सचिन सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.